महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी अमरावतीला मिशन आयएएस अंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीची स्थापना दि. १० ऑगस्ट २००२ रोजी करण्यात आली. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात अगदी गोव्यापासून ते गोंदिया पर्यंत अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी २००० स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, मी आय.ए.एस. अधिकारी होणारच ! हे कार्यक्रम घेऊन व्यापक जनजागृती केली. मानधनाची ब प्रवासखर्चाची अपेक्षा न ठेवता महाराष्ट्रातील युवकांना आय. ए. एस. च्या बाबतीत जागे करण्याचे काम आय.ए.एस. अकादमी ने केले.